
सामना प्रतिनिधी,उरण
15 जूनपर्यंत पनवेलकरांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महापालिकेने 13 डिसेंबरपासून कपात जाहीर केली आहे. त्यामुळे गुरुवारपासून शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
पनवेलला होणारा पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी व देहरंग धरण मिळून एकत्रितपणे महापालिकेस करण्यात येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व एमआयडीसी या संस्थेस पाताळगंगा नदीत दर रविवार व सोमवार या दिवशी इलेक्ट्रिक शटडाऊन, ब्रेकडाऊन आदी कारणांमुळे वारंवार कमी पाणी मिळत असल्याने देहरंग धरणाचे पाणी घेऊन शहराची दररोजची गरज भागविण्यात येते, परंतु त्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला असून 15 जूनपर्यंत उर्वरित पाणीसाठय़ाचे नियोजन करण्यासाठी ही कपात जाहीर केली आहे.

































































