
सामना ऑनलाईन । पुणे
इंग्रजी अवघड जात असल्याने अनेकांनी शिक्षण सोडल्याच्या घटना घडल्या आहेत. इंग्रजीची भिती घालवण्यासाठी पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इंग्रजीची भिती घालविण्यासाठी एका महिलेने एका तरूणीसह दोघींवर जादूटोणा करुन भिती दूर करण्याची बतावणी केली. हजरतला जायचे आहे असे सांगून त्यांना मानलेल्या भावाकडे पाठवले. त्याने त्या मुलींवर लैंगिक आत्याचार केले. गेल्या दीड वर्षापासून हा भनायक प्रकार सुरू होता. अखेर मुंढवा पोलिसांनी महिलेला आणि तिच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी शरिफ रीफक शेख (वय 28, रा. कोंढवा) याच्यासह 19 वर्षाच्या महिलेला अटक केली आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात 20 वर्षीय तरूणीने तक्रार दाखल केली आहे. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी ही मुंढव्यात रहाते. ती सध्या बीकॉमच्या प्रथम वर्षात शिकत आहे. ही पिडीत तरूणी यापुर्वी जेथे रहात होती. तेथील 13 वर्षाची मुलगी तिची मैत्रिणी असल्याने त्या दोघी सोबत असतात. या दोघींनाही इंग्रजी विषय अवघत जात असल्याने त्या खूप घाबरत होत्या. तक्रारदार तरूणीने तर महाविद्यालयात जाणेही बंद केले होते. आवश्यक उपस्थिती न भरल्याने तिला परिक्षेला बसता आले नव्हते. पिडीत तरूणीच्या आईला याची चिंता असल्याने तिने याबद्दल त्यांच्याच इमारतीमध्ये रहाणाऱ्या 19 वर्षीय महिलेकडे याची कैफीयत मांडली. त्यावेळी या महिलेने माझ्या अंगात येते, तिची इंग्रजीची भिती घालविण्यासाठी उपाय सांगते अशी बतावाणी केली. ही तरूणी या महिलेकडे गेल्यानंतर तिने तुझा पेपर ‘हजरत’ लिहील असे सांगितले. तसेच तुमच्या मुलीला भूताने बाधले आहे, ते भूत काढून टाकायचे असेल तर 500 रूपये द्यावे लागतील असे सांगितले. या तरूणीसोबत असणाऱ्या 13 वर्षाच्या मुलीलाही याबद्दल सांगितले. पिडीत तरूणी परीक्षेसाठी महाविद्यालयात जात असताना जादूटोणा करणारी महिलाही 13 वर्षाच्या पिडीतेसोबत महाविद्यालयात जात होती. महाविद्यालयाच्या बागेत ती बसत होती. ती 13 वर्षाच्या मुलीला दैवी शक्तीची भिती घालून पाय दाबायला लावत असत. तसेच पाय न दाबल्यास तुमच्या प्रेमप्रकरणाबाबतही घरी सांगेल अशी धमकी तिने दिली होती.
इंग्रजीची भिती घालविण्यासाठी ही महिला दोघींना ‘हजरत’ला घेऊन जाण्याच्या बहाण्याने कोंढव्यातील तिचा मानलेला भाऊ शरीफकडे घेऊन गेली. तेथे शरिफ आणि त्याचा अल्पवयीन मित्राने पिडीत तरूणीसह तिच्या अल्पवयीन मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केले. गेले दीड वर्ष हा अत्याचार सुरू होता. अल्वपयीन मुलीला याचा धक्का बसल्याने त्याने तिच्या आईला हा प्रकार सांगितला. तिने याची चौकशी केली असता, जादूटोण्याच्या भितीने या दोघांवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांनी मुंढवा पोलिसांकडे तक्रार केली. शरीफ आणि त्याची मानलेली बहिण या दोघांना अटक केली आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करत आहेत.



























































