
सामना ऑनलाईन, मुंबई
राजस्थानमधील उदयपूर महालात झालेल्या शाही संगीत समारंभानंतर आज पेडर रोड येथील मुकेश अंबानी यांच्या अँटिला या 27 मजली घरात ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांचा लग्नसोहळा पार पडला. अँटिलावर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. लग्नाला 600 निवडक देशी-विदेशी पाहुणे उपस्थित होते.
उदयपूरमध्ये झालेल्या शाही समारंभावेळी सर्वत्र क्षेत्रातील पाहुण्यांनी हजेरी लावली होती. यात अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रकाश जावडेकर, ममता बॅनर्जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी, चंद्राबाबू नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच बँकिंग क्षेत्रातील जागतिक मंडळी, राजकीय आणि सिनेमा क्षेत्रातील सेलिबेटींचा समावेश होता. लग्नसमारंभाला उपस्थित होते.































































