
साहित्य : एक वाटी तांदळाचं पीठ, दोन मोठे चमचे बारीक रवा, एक वाटी पाणी, एक वाटी किसलेला बटाटा, एक मोठा चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, एक चमचा हिरव्या मिरचीचे तुकडे, अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ
कृती : धिरडं करण्यासाठी सर्वप्रथम बीडाचा किंवा जाड लोखंडाचा तवा तापत ठेवावा. त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. गॅसवर ठेवलेला तवा तापला की, नारळाच्या शेंडीने तव्याला तेल लावून घ्यावं. जेणेकरून धिरडं चिकटणार नाहीत. तव्यावर आधी मिसळेलं सर्व साहित्य एकत्र करून तयार झालेलं पीठ गोल पसरवावं. बाजून किंचित तेल सोडावं आणि झाकण ठेवावं. चर्र आवाज आला की, धिरडं उलटावं. नीट उलटलं गेलं आणि जरा जाड वाटलं तरच थोडं पाणी घालून धिरडी करावीत. गरमागरम बटाट्याचं धिरडं सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करावं.

























































