
सामना ऑनलाईन,मुंबई
शीव येथील सुंदर कमला नगरात शुक्रवारी रात्री सव्वातीनच्या सुमारास 17 दुचाकी जाळल्याची घटना घडली. याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुंदर कमला नगरात 35 दुचाकी पार्क केलेल्या होत्या. त्यापैकी 17 दुचाकींना आग लागल्याची घटना घडली. त्यातील 14 दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या असून तीन दुचाकी अर्ध्याहून अधिक जळाल्या आहेत.या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. मात्र पोलीस आणि अग्निशमन दलाने वेळीच घटनास्थळावर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून आरोपीचा शोध घेत आहेत.






























































