
सामना प्रतिनिधी । नांदेड
56 इंचके सिने की क्या बात करते हो, यह सिना तो सिर्फ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे का ही हो सकता है ओ और किसका नही अशा शब्दात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जयजयकार नांडेदमध्ये करण्यात आला. देशभरातील कवींनी नांदेडकरांना वीररस, हास्यरस व देशभक्तीपर रचना सादर करुन मंत्रमुग्ध केले. शिवसेना आमदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बंदाघाट गोदावरी किनाऱ्यावर हिंदी कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कविसंमेलनाचे आयोजन सहसंपर्कप्रमुख प्रकाश कौडगे, प्रकाश मारावार, शहरप्रमुख तुलजेश यादव, शहरप्रमुख सचिन किसवे, माजी शहरप्रमुख बिल्लू यादव, गुरमितसिंग टमाणा, माजी तालुकाप्रमुख निळकंठ काळे यांनी केले होते. नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या कविसंमेलनाच्या कार्यक्रमाला हजारो रसिकांनी थंडीच्या कडाक्यात हजेरी लावली होती.
हिंदी कविसंमेलनात शांती तुफान या कवीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केलेल्या कवीतेला प्रचंड दाद मिळाली.
प्रश्न उत्तर से किया
जबाब दक्षिण से आया
महाराष्ट्र के बाळासाहेब ठाकरे ने ललकारा
अगर अमरनाथ यात्रा नही होगी
तो हज का प्रस्तावही नही होगा
अब कुछ लोक 56 इंच की
सिने की बात करते है
यह सिना तो सिर्फ और सिर्फ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे का ही था
या कवितेच्या ओळीनंतर उपस्थितांनी बाळासेहबांच्या नावाचा जयजयकार केला. कविसंमेलनात शांती तुफान यांनी मिश्कील शैलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक कविता सादर केली.
देश को कैसे नेता मिले है
राहूल गांधी जो माँ की सुनते नही
अखिलेश यादव जो बाप की सुनते नही
और नरेंद्र मोदी जो किसी की सुनते नही
कविसंमेलनाची सुरुवात पद्मीनी शर्मा यांच्या सरस्वती वंदनेने झाली. त्यांनी शृंगार रसाच्या कविता प्रभावीपणे सादर केल्या. त्यांनी सैनिकांवर केलेली कविता गीत श्रोत्यांच्या मनात घर करुन गेली. त्यांच्यात आणि सूत्रसंचालक शशिकांत यादव यांच्यामधील संवादानांही श्रोत्यांनी दाद दिली.
राम मंदिर बनाने की
गर्जना तो बहुत लोगो ने की थी
मगर शिवसेना के पक्षप्रमुख
उध्दव ठाकरे अयोध्या गये
तो सारे हिंदुस्थान मे हडबड मज गयी
ये दिल्ली वालो, अब बस हो गया
अब राम मंदिर नही बनायेंगे
तो जनता तुम्हे माफ नही करेंगी
अशी गर्जनाही शशिकांत यादव आपल्या कवितेत केली.
सुरेंद्र राघवेंद्र यांनी सैनिकांवर केलेली कविता श्रोत्यांना हेलावून गेली. उणे 49 तापमानात देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या जवानांबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मौत स्वयंम शर्मिदा
हनमंता हर दिल मे है जिंदा
पाकिस्तानवर केलेला सर्जिकल स्ट्राईकबद्दलही त्यांनी प्रभावी कविता सादर केल्या. अशोक चारण या वीररसाच्या कविने श्रोत्यांची प्रचंड दाद घेतली. जवाहरलाल नेहरु विद्यापीठात हिंदुस्थानविरोधात देण्यात आलेल्या घोषणांबाबतच्या कवितेलाही रसिकांनी दाद दिली. चीनच्या हिंदुस्थानविरोधी कारवायांवर आसूड ओढणारी कविता त्यांनी सादर केली. कारगील युध्दात एका शहीदाचे मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले…
मेरी मौत को मिले तिरंगा
मर कर भी जी जाऊंगा
अंतिम घडी तक मै तो
अपना फर्ज निभाऊंगा
राम शिकरवार या कवीने अण्णा हजारेंच्या आंदोलनाची प्रशंसा करणारी कविता सादर केली. कविसंमेलनाचे उद्घाटन संपर्कप्रमुख आनंद जाधव यांनी दिपप्रज्वलनाने केले. सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार, प्रकाश कौडगे, भुजंग पाटील, रघुवीर मोरे, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंदराव पाटील बोंढारकर, उमेश मुंडे, लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, पणन महासंघाचे माजी संचालक रामभाऊ चन्नावार, नगरसेवक बालाजी कल्याणकर, महानगरप्रमुख अशोक पाटील उमरेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रस्ताविकात राजश्री पाटील यांनी गोदावरी नदी घाटावर गोदावरी महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली. त्या म्हणाल्या की, ज्या गोदावरीमुळे नांदेड शहर पवित्र झाले आहे, त्या गोदावरीमध्ये प्रदूषण वाढले आहे. या भागाची स्वच्छता करण्याचा निर्णय हेमंत पाटील यांनी घेतला आणि गोदावरी नदीविषयची श्रध्दा व्यक्त केली. गेल्या तीन दिवसांपासून शेकडो शिवसैनिक आणि बजरंग दल, विश्व हिंदू परिषद या संघटनेचे कार्यकर्ते मनापासून स्वच्छता अभियान राबवित आहेत त्याचाच परिणाम म्हणून हा परिसर स्वच्छ झाला आहे.




























































