
सामना प्रतिनिधी। नगर
मोटारसायकल वरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाऱ्या मोटारसायकलची समोरुन येणाऱ्या मोटारसायकलला धडक बसली. यात एकजण ठार झाल्याची घटना नगर पाथर्डी रोड वरील शहापूर शिवाराजवळ घडली. यात लिंबाजी कुंडलिक दारकुंडे (32 ) हा इसम ठार झाला.
नगर पाथर्डी रोडवरून भरधाव वेगात धावणाऱ्या मोटारसायकल (क्र.एम.एच. 17 बी. एच. 6541) वरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटारसायकल रस्त्याच्या उजव्या बाजूस जाऊन समोरून येणार्या मोटारसायकल (क्र.एम एच. 16 बी. ई. 4019) वर जाऊन धडकली. या धडकेत मोटारसायकलस्वार लिंबाजी जागीच ठार झाला. अपघातात दोन्ही मोटारसायकलचे मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी संतोष दिलीप भालसिंग (रा. शहापूर ) यांच्या फिर्यादीवरून भा.दं. वि. क. 304 (अ ) 279, 337, 338, 427 मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे अपघाताच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक फौजदार गायकवाड हे करीत आहेत.






























































