‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर रणवीर सिंगची धम्माल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

‘झी मराठी’वरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या मराठीतील प्रचंड गाजत असलेला विनोदी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील कलाकारही त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशन करायला येतात. नुकतंच या कार्यक्रमाच्या सेटवर सिंबा चित्रपटाच्या टीमने हजेरी लावली. यावेळी बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग हा त्यावेळी उपस्थित राहणार आहे.

रणवीरसोबत चित्रपटातील मुख्य अभिनेत्री सारा अली खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, सौरभ गोखले आणि अशोक समर्थ हे देखील उपस्थित राहणार आहेत. येत्या 24 डिसेंबर आणि 25 डिसेंबर ला रात्री 9.30 ला कार्यक्रम प्रसारित होणार आहे.