
सामना ऑनलाईन, मुंबई
विजय हजारे ट्रॉफी जिंकून या मोसमाची दमदार सुरुवात करणाऱ्या मुंबई क्रिकेट संघाला रणजी ट्रॉफीत आपला ठसा उमटवता आला नाही. मुंबईच्या संघाने पाच सामन्यांमधून फक्त आठ गुणांचीच कमाई केली असून हा संघ सध्या गटामध्ये सहाव्या स्थानावर फेकला गेला आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्या मुंबईसमोर सौराष्ट्रचे आव्हान असणार आहे. आता उर्वरित लढतींमध्ये मुंबईला विजय आवश्यक आहे.अनुभवी गोलंदाज धवल कुलकर्णीचे पुनरागमन मुंबईसाठी हितकारक ठरू शकते.
स्पर्धेच्या गुणतालिकेवर नजर टाकल्यास मुंबईचा संघ ‘अ’ व ‘ब’ या दोन्ही गटांतून तेराव्या स्थानावर आहे. याचा अर्थ मुंबईला पुढल्या फेरीत पोहचण्यासाठी सौराष्ट्रसह इतर लढतींमध्येही विजय मिळवणे गरजेचे आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत मुंबईची दैना उडाली आहे.




























































