
सामना ऑनलाईन, वसई
एव्हरशाईन नगरमध्ये मॉर्निंग वॉकला निघालेल्या वृद्ध दांपत्याला एका भरधाव गाडीने उडवलं आहे. यातील वृद्ध पुरुषाला उडवल्यानंतर कारचालकाने निर्दयीपणे त्याच्या अंगावरून गाडी नेत त्याला फरफटत नेलं. यानंतरही कारचालक थांबला नाही त्याने कारसकट तिथून पळ काढला. पोलीस या कारचालकाचा शोध घेत आहेत.

























































