“नो वन किल्ड सोहराबुद्दीन”, राहुल गांधींचा टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणातील 22 आरोपींना निर्दोष सोडले आहे. या निर्णयाच्या पार्श्वभुमिवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उपहासात्मक ट्वीट केले आहे. त्यात राहुल गांधी यांनी “कुणाचीही हत्या झालेले नाही…हरेन पांड्या, तुलसीराम प्रजापति, जस्टिस लोया, प्रकाश ठोंब्रे, श्रीकांत खांडालकर, कौसर बी, सोहराबुद्दीन शेख… या सर्वांचा मृत्यू आपोआप झाला.” असे म्हटले आहे.

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांसह 22 आरोपिंची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पंड्या यांची 26 मार्च 2003 रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी नरेंद्र मोदी होते. या हत्येप्रकरणी गँगस्टर सोहराबुद्दीन शेखला 2005 मध्ये एन्काऊंटर करण्यात आला. सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणाची सुनावणी जस्टिस बी.एच. लोया करत होते. मात्र जस्टिस लोया यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. तसेच याच प्रकरणाशी संबंधीत वकील श्रीकांत खांडालकर यांचा देखील 29 नोव्हेंबर 2015 संशयास्पद रित्या मृतदेह आढळला होता.

सोहराबुद्दीन एन्काऊंटर प्रकरणात भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे देखील नाव आरोपिंमध्ये होते मात्र 2014 मध्ये त्यांना दोषमुक्त करण्यात आले होते. सीबीआय विशेष न्यायमूर्ती एस. जे. शर्मा यांनीही यांनी हा आपला शेवटचा खटला असल्याचे स्पष्ट केले. या महिनाअखेर न्यायमूर्ती शर्मा निवृत्त होणार आहेत. दरम्यान, सीबीआय विशेष न्यायमूर्ती एस. जे. शर्मा यांनीही यांनी हा आपला शेवटचा खटला असल्याचे स्पष्ट केले. या महिनाअखेर न्यायमूर्ती शर्मा निवृत्त होणार आहेत.