मुक्ताईनगरात शिवसेनेचे रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना ऑनलाईन, मुक्तीईनगर

संभाजीनगर- इंदौर रस्त्याच्या कामामुळे रस्त्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होत असून त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेतर्फे शनिवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

शहरातील महामार्गावर संभाजीनगर, इंदौर रस्त्याची कामे होत आहेत. यामुळे रस्त्याला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे. यापूर्वी वारंवार तहसीलदारांना निवेदने देऊनसुद्धा आजपर्यंत शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. तसेच संबंधित ठेकेदार हा अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करता मनात येईल, त्याप्रमाणे काम करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

याकरिता तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात तालुकाप्रमुख छोटू गोपाळ सोनवणे, अॅड. मनोहर खैरनार, अफसर खान, बाळा भालशंकर, सुनील पाटील, राजेंद्र हिवराळे, गणेश टोंगे, विठ्ठल तळेले, वसंता भलेभले, संतोष मराठे, रोहिदास पाटील, योगेश पाटील, ईश्वर पाटील, दिलीप पाटील, सचिन पाटील, नितेश पाटील, गजानन पाटील, शुभम पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत पाटील, पवन सोनवणे, नारायण पाटील, शिवसैनिक तसेच शेतकरी उपस्थित होते.