प्रेम म्हात्रे यांची T-20 क्रिकेटसाठी निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पेण

पेण येथील प्रेम सुर्यकांत म्हात्रे (मुळगाव वढाव – पेण) यांची T-20 क्रिकेट इंटरनॅशनल चॅम्पियनशीपसाठी निवड करण्यात आली आहे. नेपाळ मधील पोखरा येथे इंडो-नेपाळ T-20 क्रिकेट इंटरनॅशनल चॅम्पियनशीप 2018-19 आयोजित करण्यात आली आहे. हिंदुस्थान सरकारच्या युवा खेळ मंत्रालयांतर्गत असलेल्या T- 20 क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी मोहम्मद सादीक यांनी प्रेम सूर्यकांत म्हात्रे यांच्या निवडीचे पत्र दिले आहे. प्रेम सुर्यकांत म्हात्रे यांनी यापूर्वीही तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपल्या खेळाचे नैपूण्य दाखविले आहे.