2019 मध्ये ‘नो लाँग विकेंड!’, माराव्या लागणार ‘दांड्या’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

पुढच्या वर्षी दोस्तमंडळींसोबत किंवा कुटुंबासोबत बाहेर जायचा बेत आखत असाल तर थांबा. आधी ही बातमी वाचा. कारण पुढच्या वर्षी म्हणजेच 2019मध्ये मोठे विकेंड नसल्याने तुमची पंचाईत होण्याची शक्यता आहे.

पर्यटनाच्या शौकिनांना यंदाचं वर्ष पर्वणीसारखं होतं. कारण, यंदा 16 मोठे विकेंड आले होते. त्यामुळे फारशा सुट्ट्या न घेता अनेकांनी कुटुंबासमवेत पिकनिकचा आनंद लुटला. पण, त्या सुट्ट्यांची भरपाई पुढच्या वर्षी करावी लागणार अशी चिन्हं आहेत. कारण, पुढच्या वर्षी मोठे विकेंड फक्त 10 मिळणार आहेत. त्यामुळे तुम्हाला पिकनिकला जायचं असेल तर सुट्ट्या टाकाव्या लागणार आहेत किंवा मग ‘दांडी’ मारावी लागणार आहे.

पहिला मोठा विकेंड जानेवारीत सुरू होत असून नंतर एप्रिल, ऑगस्ट, ऑक्टोबर अशा महिन्यांमध्ये मोठे विकेंड मिळू शकतात. पण त्यासाठी वर्षभरात तब्बल 13 अतिरिक्त सुट्ट्या घ्याव्या लागतील. तसंच ऑगस्ट महिन्यात 9 सुट्ट्या असल्यामुळे तुम्ही पावसाळी सहल आयोजित करू शकता. त्याखेरीज आपापल्या कार्यालयीन सुट्ट्याही त्यात भर घालू शकतील. 2018 हे वर्ष पर्यटनासाठी अतिशय चांगलं होतं. पण, 2019मध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी तुम्हाला व्यवस्थित वेळापत्रक आखणं गरजेचं असणार आहे.