
सामना प्रतिनिधी, धुळे
कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काटय़ावर शेतमालाचे वजन केल्यानंतर शेतकऱयांकडून तोलाई आकारू नये असे आदेश शासनाने दिले आहेत. या आदेशाची अमंलबजावणी 26 डिसेंबरला झाली. त्यामुळे हमाल-मापाडी, आडते, व्यापारी आणि शेतकऱयांमध्ये वाद झाले. हा वाद पेटला आहे. तोडगा निघेपर्यंत बाजार समिती प्रशासनाने बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सन्मानजनक तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा आज आंदोलक हमाल-मापाडय़ांनी दिला.
कृषी उत्पन्न बाजार समितीत इलेक्ट्रॉनिक वजन काटॊय़ावर शेतमालाचे वजन करण्यात येते. त्यामुळे शेतकऱयांकडून तोलाई आकारू नये, असा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अमंलबजावणी धुळे बाजार समितीने सुरू केली आहे. त्यानंतर बुधवारी बाजार समितीत वाद झाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हिलाल माळी यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात लिलाव सुरू झाले. त्यानंतर गुरूवारी पुन्हा जैसे थे स्थिती निर्माण झाली. हमाल-मापाडी, आडते-व्यापारी आणि शेतकऱयांमधील वाद वाढले.
हमाल-मापाडी आणि शेतकरी यांच्यातील वाद वाढल्याने बाजार समिती प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. या विषयी मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तोलाई विषयी घेतलेला निर्णय मागे घ्यावा, जो पर्यंत तोडगा निघत नाही तो पर्यंत बाजार समितीतील वजन काटयाजवळ धरणे आंदोलन सुरू राहील, असा इशारा हमाल-मापाडी संघटनेचे गंगाराम कोळेकर यांनी दिला.


























































