नगर : राष्ट्रवादी-भाजपमध्ये राडा; तलवारीने वार, एक गंभीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

वंजारगल्ली येथील जाळपोळीचे प्रकरण ताजे असताना पारशाखुंट येथे राष्ट्रवादी आणि भाजपच्या कुरेशीच्या दोन गटात जोरदार हाणामार्‍या झाल्या. तलवारीने वार केल्याने दोघे जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. या घटनेमुळे शहरता एकच खळबळ उडाली आहे. भाजप व राष्ट्रवादी आता भिडल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच तणाव निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, पोलिसांनी या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला असून कोतवाली पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यामध्ये समीर बाबूराव कुरेशी, बिस्मिता शेख कुरेशी व इतर त्यांचे 20 ते 25 जण तसेच दुसर्‍या गटातील जावेद अहमदलाला कुरेशी, शापल शब्बीर कुरेशी, शब्बीर अम्मू कुरेशी, आसिफ शब्बीर कुरेशी, मय्याज शब्बीर, कुरेशी व त्यांचे 20 ते 25 साथीदार (सर्व रा. नालबंदखुंट), आतिक अर्बार कुरेशी, अफसर मुहंमद कुरेशी, अफजल त्यानंतर जिल्हा रुग्णालयातही एकमेकांना भिडले. अर्बान कुरेशी, लतीफ अब्दुल अन्सारी, बिस्मिता शेख कुरेशी, शाहीद (सर्व रा. कोठला) अशी आरोपींची नावे आहेत.

शहरातील नालाबंद खुंट येथे निवडणुकीच्या कारणावरुन सोमवारी रात्री दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर या हाणामारीतील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेल्यानंतर तेथेही हे दोन्ही गट एकमेकांना भिडले. यावेळी आपआपसात झोंबाझोंबी करत दोन्ही गटांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच तोफखाना पोलिस ठाण्यात पोलिसांच्या फिर्यादीवरुन एकमेकांना मारहाण करुन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीर बाबूराव कुरेशी, बिस्मिता शेख कुरेशी व इतर त्यांचे 20 ते 25 जण तसेच दुसर्‍या गटातील जावेद अहमदलाला कुरेशी, शापल शब्बीर कुरेशी, शब्बीर अम्मू कुरेशी, आसिफ शब्बीर कुरेशी, मय्याज शब्बीर, कुरेशी व त्यांचे 20 ते 25 साथीदार (सर्व रा. नालबंदखुंट), आतिक अर्बार कुरेशी, अफसर मुहंमद कुरेशी, अफजल त्यानंतर जिल्हा रुग्णालयातही एकमेकांना भिडले. अर्बान कुरेशी, लतीफ अब्दुल अन्सारी, बिस्मिता शेख कुरेशी, शाहीद (सर्व रा. कोठला) अशी आरोपींची नावे आहेत. रात्री सव्वाबारा वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालय परिसरात नालबंद खुंट येथे झालेल्या भांडणाच्या कारणावरुन एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन एकमेकांच्या गचांड्या पकडत आपआपसात झोंबाझोंबी केली, असे सहाय्यक फौजदार गिनानदेव जाधव (नेमणूक एमआयडीसी पोलिस ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात वरील आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दरम्यान, काल रात्री 11 च्या सुमाराल ही घटना घडल्यानंतर शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके हे घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी जखमींची विचारपूस केली. या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.