
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालुक्यातील आलमला शिवारात बाभळीच्या झाडास साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका अनोळखी इसमाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सदरील मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ वर्षे आहे.
याप्रकरणी औसा पोलिसात अकस्मात मृत्यू १/१८ कलम १७४ प्रमाणे गुन्हा नोंद केला असून सदरील अनोळखी इसमाचे प्रेत शवविच्छेदनानंतर शवगृह, जिल्हा रुग्णालय लातूर येथे ओळख पटवण्यासाठी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी जमादार एम. एन. गिरी हे पुढील तपास करीत आहेत.



























































