…आणि खंडोबाला हळद लागली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी वाजत गाजत पारनेर तालुक्यातील पिंपळगावरोठा येथील श्री कोरठण खंडोबाच्या पौष नवरात्राला प्रारंभ झाला असून शेकडो महिलांनी देवाला हळद लावली. पौष पौर्णिमेला खंडोबाचे म्हाळसाबरोबर लग्न झाले त्यानिमित्त आज हा कार्यक्रम येथे संपन्न झाला

हळदीच्या या कार्यक्रमाची सकाळपासूनच लगबग सुरू होती. पिपळगावरोठा गावात वाजत गाजत मिरवणूक काढली,हळकुंड व पूजेचे सामान घेऊन महिला गावातून वाजत गाजत आल्या,मंदिरात जात्यावर हळद दळून देवाच्या महिमा,गाणे,ओव्या गात सभापती जयश्री औटी, मनीषा जगदाळे, तृप्ती औटी,सोनाबाई चौधरी प्राचार्य उषा रोहकले अरुणा शिरोळे आदी मान्यवरांसह कुसुम झावरे,रखमा खोसे आदीसह शेकडो महिलांनी देवाला हळद लावली.

पिंपळगावरोठा येथे कोरठण खंडोबाचे जागृत देवस्थान आहे. राज्यभरातील लाखो भाविकांचे ते कुलदैवत आहे. जिल्ह्यातील यात्रोत्सवाला प्रथम याच यात्रेने प्रारंभ होत असल्याने या यात्रेला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या,स्वयंभू श्री क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान तीर्थक्षेत्रावर वार्षिक यात्रा महोत्सव २१ ते २३ जानेवारी २०१९ दरम्यान मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने भरणार आहे. 3 दिवसांच्या यात्रेला 6 लाखांवर यात्रेकरु,कुलदैवत खंडोबाच्या कोरठण गडावर येऊन देवदर्शन करतील,धार्मिक व सामाजिक संस्कृती जोपासणारी लाखो भाविकांच्या,भक्तीमय मांदीयाळीचे दर्शन घडविणारी यात्रा म्हणून या यात्रेचे महत्व आहे. पौष पौर्णिमेला श्री खडोबाचे म्हाळसादेवी बरोबर लग्न झाले. म्हणून दरवर्षी पौष पौर्णिमेला 3 दिवस मोठा यात्रोत्सव येथे भरतो.पौष षष्टीला शेकडो महिला देवाला हळद लावतात व यात्रेचे नवरात्र सुरु होते

कार्यक्रम यशस्वीतेसाठी देवस्थानचे अध्यक्ष अॅड पांडुरंग गायकवाड,चिटणीस मनिषा जगदाळे,,उत्सव समिती साहेबा गुंजाळ,अन्नछत्र ,विश्‍वस्त अमर गुंजाळ,किसन मुंढे,बन्सी ढोमे,,दिलीप घोडके,देविदास क्षीरसागर,उपसरपंच बाळासाहेब पुंडे, राजू मटाले ,रामदास मुळे , सुरेश ढोमे,शांताराम खोसे, गोपीनाथ घुले, जालिंदर खोसे,उत्तम सुबरे , राजाराम मुढे आदींसह पंचक्रोशीतील महिला यांनी प्रयत्न केले.