भगवान बाबांच्या मूर्तीची विटंबना: निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । जामखेड

शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावरील खर्डा बस स्थानक येथे गुरुवारी आठवडे बाजाराच्या दिवशी भगवान बाबा भक्त मंडळ व समाज बांधवांच्या वतीने राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोको आंदोलन करून विटंबना करणाऱ्या नगर येथील स्वप्नील शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत घटनेची सविस्तर चौकशी करण्यात येऊन दोषीवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन भक्त व समाज बांधवांच्या वतीने जामखेड पोलीस उपनिरीक्षक अवतारसिंह चव्हाण यांना देण्यात आले.

यावेळी सरपंच संजय गोपाळघरे, भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष अॅड. प्रविन सानप, माजी सरपंच शिवकुमार गुळवे, माजी उपसरपंच भागवत सुरवसे, मदन पाटील, ग्रामपंचायत सदस्य गणेश डाडर, विकास शिंदे, बाबासाहेब चौधार, बळीराम दराडे, महालिंग कोरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, अॅड. सुभाष जायभाय, डॉ. जयराम खोत, डॉ. सोपान गोपाळघरे, भास्कर गोपाळघरे, दत्तात्रय गोपाळघरे, भीमराव गोपाळघरे, नवनाथ गोपाळघरे, बाजीराव गोपाळघरे ओंकार बारगजे, गोविंद खाडे, तात्याराम होडशीळ, दीपक होडशीळ, रोहिदास केकान सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माथेफिरू स्वप्नील शिंदे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करून करण्यात आले. पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आला होता. कुठलाही अनुचित प्रकार न घडता निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी समाज बांधवांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत घोषणा देत संबंधित माथेफिरूच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची घोषणा देताना दिसून आले.