
सामना प्रतिनिधी । कुडाळ
शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत बुधवार दि. 23 जानेवारी पासून दोन दिवसांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
खासदारांचा नियोजित दौरा पुढीलप्रमाणे- बुधवार दि. २३ जाने. रोजी सकाळी १०.३० वाजता – पिंगुळी(ता.कुडाळ) रवळनाथ सभागृह म्हापसेकर तिठा मसाले रोप वाटप कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी ११.०० वाजता वेंगुर्ले येथे गॅस वितरण कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी १२.३० वाजता-शिवसेना शाखा सावंतवाडी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी ३.०० वाजता-इन्सुली (ता.सावंतवाडी) ब्रीज भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती, सायंकाळी ५.०० वाजता-आंबोली(ता.सावंतवाडी) जि. प.सदस्यांच्या निधीतील रस्त्त्यांच्या कामांची भूमिपूजने, शिवसेना शाखा आंबोली शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमास उपस्थिती, रात्रौ ८.३० वाजता-स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर स्वरचित गझल कार्यक्रमास उपस्थिती – स्थळ – शिवसेना शाखा मालवण, गुरुवार दि. २४ जाने.रोजी सकाळी ११.०० वाजता आंगणेवाडी(ता.मालवण) पाणी पुरवठा योजना पहाणी, दुपारी १२.३० वाजता वानिवडे (ता.देवगड) खारबंधारा भूमीपूजन, दुपारी ३.०० वाजता-तोडवली- बावशी (ता.कणकवली) ग्रामपंचायत भूमीपूजन, सायंकाळी ५.३० वाजता- कणकवली दत्तमंदिर अंडरपास ब्रीज उद्घाटन, सायंकाळी ६.१५ वाजता-कणकवली श्री. स्वयंभू मंदिर सुशोभिकरण उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती.
































































