
सामना प्रतिनिधी । जालना
युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे ३ फेब्रुवारी रोजी जालन्यात येत असून त्यांच्या हस्ते विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे उद्धाटन होणार आहे.
जालना येथे राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या संकल्पनेतून सुरु असलेल्या राष्ट्रीय महापशुधन एक्स्पो-१९ या पशुप्रदर्शनाला ते भेट देणार असून युवा सेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा पॅकेज अंतर्गत गाय, म्हैस, शेळी वाटप करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या अनुदानीत गोशाळांना गौरवपत्र वितरण करण्यात येणार आहे. तर जालना शहरातील १०० खाटाच्या जिल्हा स्त्री रुग्णालय नुतन इमारतीचा लोकार्पण सोहळा सकाळी १०.३० वाजता गांधीचमन येथे युवासेना प्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे व आरोग्य व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी पशुसवंर्धन दुग्धविकास मंत्री अर्जुनराव खोतकर, तर पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, तर विशेष उपस्थिती पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची राहणार आहे. या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रावसाहेब दानवे, आमदार राजेश टोपे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपनेते लक्ष्मणराव वडले, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, शिवेसना सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे, डॉ. हिकमतराव उढाण, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, माजी खासदार पुंडलिकराव दानवे, माजी खासदार उत्तमसिंग पवार, अॅड. हरिभाऊ झोल रामेश्वर भांदरगे, माजी आमदार अरविंद्र चव्हाण, माजी आमदार कल्याण काळे, माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, माजी आमदार चंद्रकांत दानवे, प्रभाकर पालोदकर, संतोषराव दसपुते, माजी आमदार शंकुतला शर्मा, उपजिल्हाप्रमुख पंडीत भुतेकर, किसानसेनेचे भानुदास घुगे आदी उपस्थित रहाणार आहेत.
युवासेना विस्तारक अभिमन्यु खोतकर, सभापती आरोग्य रघुनाथ तौर, सभापती पांडूरंग डोंगरे, युवासेनेचे भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब राऊत, मोहन अग्रवाल, रमेश गव्हाड, हनुमान धांडे, माधवराव कदम, मनिष श्रीवास्तव, भगवान कदम, परमेश्वर जगताप, कैलास पुंगळे, अशोक शिंदे, जयप्रकाश चव्हाण, अशोक बर्डे, बजरंग बोरसे, माधवराव हिवाळे, नवनाथ दौड, हरिभाऊ पोहेकर, उद्धव मरकड, बाबासाहेब तेलगड, अजय अवचार,शहरप्रमुख विष्णु पाचफुले, तालुकाप्रमुख संतोष मोहिते. तसेच जुगलकिशोर भाला, अॅड. व्ही.आर. नाईक, आर.आर. खडके, जयेश शाह, सतीश टोपे, बाबासाहेब इंगळे, बाबुराव कुलकर्णी, भिमराव डोंगरे, डॉ. संजय राख, गोपाल काबलिये, भाऊसाहेब पाऊलबुध्दे, तुकाराम शेजुळ, बप्पासाहेब गोल्डे, उद्योजक कैलास लोया, सुभाष अजमेरा, ओम भारुका, ओम मंत्री, अरुण अग्रवाल, अॅड. ब्रम्हानंद चव्हाण, विलास नाईक, दिलीपराव तौर, शहरप्रमुख आत्मानंद भक्त, शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड. भास्कर मगरे, महिला आघाडीच्या सविता किवंडे, नगरसेवक विजय पवार, गटनेता निखिल पगारे, उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ, संभाजीनगरचे डॉ. स्वप्निल लाळे, मुख्य अभियंता के.टी. पाटील आदींचीही उपस्थिती राहणार आहे.
या सोहळ्यास जास्तीत-जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता जागतिक बँक प्रकल्पाचे एस. एस. मांगुळकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आर. एस. पाटील यांनी केले आहे.




























































