
सामना ऑनलाईन । मुंबई
माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुल बाजार व्यापारी मंडळ आणि स्व. सुदाम मंडलिक स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सव्वाशेहून अधिक विक्रेत्यांनी सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या शिबिराला नगरसेविका प्रीती पाटणकर, विभाग संघटक श्रद्धा जाधव, नगरसेविका उर्मिला पांचाळ, शिक्षण समितीचे अध्यक्ष मंगेश सातमकर, खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अध्यक्ष मनोज पुंडे, सल्लागार शिवराज मंडलिक, प्रवीण जाधव, दयानंद पुंडे, राजेंद्र भिंगणे, सुरेश कुदळे उपस्थित होते.























































