Video – उत्तरेकडून थंडीचा जबरदस्त हल्ला, महाबळेश्वरचा पारा शून्य अंशापर्यंत खाली घसरला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । महाबळेश्वर

महाराष्ट्तील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये पारा शून्य अंशांपर्यंत खाली आला आहे. वेण्णालेक परिसरात स्ट्रॉबेरी पिकावरील दवबिंदू गोठून त्याचा बर्फ झाला आहे. तर अनेक ठिकाणी ठेवलेले पाणी गोठून त्याचा बर्फ झाल्याने महाबळेश्वरमध्ये कश्मीर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानात उत्तरेकडील राज्यांसह महाराष्ट्रातही थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. आज पहाटे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध वेण्णा लेक, लिंगमळा परिसरात दवबिंदू गोठून मोठ्या प्रमाणात हिमकण जमा झाले आहेत. तसेच वाहनांच्या टपांवर देखील दविंबदू गोठल्याने हिमाकणांचा थर जमा झाला आहे. अचानक वाढलेल्या थंडीमुळे पर्यटकांना महाबळेश्वरमध्ये सुखद गारवा अनुभवायला मिळतोय. त्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.