
1 / 6
धावपळीच्या युगात ताणतणावाचे प्रमाण देखील वाढले आहे. तणाव हा आजारांना आमंत्रण देतो. तेव्हा आजारांना दूर ठेवण्यासाठी तणावाला पळवून लावावे लागेल. त्यासाठी अगदी सहज जमतील असे 5 उपाय येथे आम्ही देत आहोत.
1>> डोळ्यांना हाताने ऊब द्या!
मांडी घालून जरा शांत बसा. डोळे बंद ठेवा. काही वेळानंतर हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊब डोळ्यांना द्या. दिवसातून कितीही वेळा ही क्रिया तुम्ही करु शकता. तुम्हाला नक्की फ्रेश वाटेल.
2>> दीर्घ श्वास
डोळे बंद करून अगदी सावकाश असा दीर्घ श्वास घ्या. श्वास आत घेताना (पुरक) आणि बाहेर सोडताना (रेचक) त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. असं पाच ते सात वेळा केल्यास सगळा ताण, थकवा दूर होईल आणि एकदम ताजंतवानं वाटू लागेल.























































