पत्नीचा मारेकरी अवघ्या आठ तासात जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

परभणी शहरातील वांगी रोड हाडको येथे पत्नीला ओढणीने गळफास देऊन यमसदनी पाठविणाऱ्या मारेकरी आनंद खंदारे यास फरार होण्याच्या स्थितीत असताना उदगिर येथून पोलिसांनी पाठलाग करत परभणी रेल्वेस्थानकावर सापळा रचला. त्यानंतर मोठ्या शिताफीने या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

हाडको येथील रहिवाशी आनंद खंदारे याने त्याची पत्नी मयुरीला १७ नोव्हेंबर २०१७ रोजी पळवूून नेले होते. १८ नोव्हंबर रोजी आनंद खंदारेची मानलेली आई गयाबाई खंदारे हिचा खून झाला होता. या खून प्रकरणामध्ये फिर्यादी संगीता वाकळे व तिचा पती हे आरोपी आहेत. चंद्रकांत सध्या कारागृहात आहे. मयुरीचा पती आनंद याने आईचा खून केल्याचा राग मनात धरुन बदला घेण्याच्या इराद्याने धमक्यात देत होता. मयुरी खंदारे हिचा आरोपी आनंद खंदारे याने वांगी रोड येथील राहत्या घरी ओढणीने गळा आवळून खून करून घटनास्थळावरुन फरार झाला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी संगीता वाकळे हिच्या तक्रारीवरुन नानलपेठ पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय परदेसी आणि नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधार्थ तात्काळ पथके रवाना केली. पोलीस अधीक्षकांच्या पथकाने तातडीने कारवाई करत फरार आरोपी आनंद नाथा खंदारे याबाबतील माहिती काढून शहरात व इतर ठिकाणी शोध मोहिम सुरु केली. अवघ्या आठ तासात यापथकाने आरोपीचा उदगिर येथून पाठलाग करुन परभणी रेल्वेस्थानकावर सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले. वेळीच कारवाई केल्यामुळे फरार होण्याच्या इराद्यात असताना त्यास अटक करुन नानलपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.