
सामना प्रतिनिधी । लोणावळा
जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे हिंदुस्थानी जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून हल्ला करण्यात आला या हल्ल्यात 42 जवान शहीद झाले होते.
या भ्याड हल्ल्याच्या निषेर्धात शिवसेना मावळच्या वतीने कामशेत येथे निषेध करण्यात आला. यावेळी मावळ लोकसभा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या हल्ल्याचा निषेध केला. सरकारने कठोर पाऊले उचलून भविष्यात पाकिस्तान अशा प्रकारचे कृत्य करणार नाही अशी कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, डॉ.विकेष मुथा, उपतालुका प्रमुख मदन शेडगे, चंद्रकांत भोते व युवा सेना मावळ चिटणीस विशाल हुलावळे, शहर प्रमुख सतीश इंगवले, विभागप्रमुख जयदास ठाकर व भा.वि.से संघटक धनंजय नवघणे, युवती सेना अधिकारी दिपाली भिलारे, गणेश भोकरे, सोमनाथ कोडे, दिपक कोकाटे, नितीन बदर, अंकुश सातकर व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते.





























































