येत्या मंगळवारी दिसणार सुपरमून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

खगोलप्रेमींसाठी खूशखबर आहे. येत्या मंगळवार, 19 फेब्रुवारी रोजी माघ पौर्णिमेच्या रात्री अवकाशात सुपरमूनचे दर्शन होणार आहे. त्या दिवशी चंद्र नेहमीपेक्षा अधिक मोठा आणि तेजस्वी दिसणार आहे. हा एक दुर्मिळ योग असल्याचे खगोलतज्ञ दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

दर पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो. त्यावेळी चंद्रबिंब 14 टक्के मोठे आणि तेजस्वी असते. चंद्र पृथ्वीपासून 3 लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर असतो. येत्या मंगळवारी तो पृथ्वीच्या 3 लाख 56 हजार 761 किलोमीटर अंतरावर येणार असल्याने मोठा दिसणार आहे. मंगळवारी सायंकाळी 6 वाजून 27 मिनिटांनी चंद्र पूर्व क्षितिजावर उगवणार आहे.