जय मलंग…श्री मलंगचा जयघोष, मलंगगडावर भगवा उत्साह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, कल्याण

जय मलंग… श्री मलंग, हिंदूंची वहिवाट… हीच मलंगमुक्तीची पहाट अशा जयघोषाने आज मलंगगड दुमदुमून गेला. निमित्त होते माघी पौर्णिमेचे. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले. ही परंपरा अखंड सुरू आहे. या वर्षीही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हर… हर… महादेक, शिवसेना झिंदाबाद अशा गगनभेदी गर्जना करत हजारो हिंदू भाविकांचे भगवे वादळ मलंगगडावर धडकले.

भगके ध्वज खांद्यावर घेतलेले शिवसैनिक आणि वाहनांवर फडफडणाऱ्या भगव्या पताका असे सर्वत्र भारावून टाकणारे वातावरण होते. कल्याण, ठाणे, उल्हासनगर अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पालघर, वसई, रायगड आदी परिसरातून मोठय़ा संख्येने भाविक उत्स्फूर्तपणे आले होते. ‘हिंदूंची वहिवाट हीच मलंगमुक्तीची पहाट’ असा नारा देत सकाळपासूनच हिंदू भाविकांचे जथ्थे गडावर जाऊन मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन घेत होते. पहाटे मलंगगडावर पालखी नेण्यात आल्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते.

सायंकाळी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मलंगनाथांच्या समाधीची विधिवत पूजा करून आरती करण्यात आली. शिवसेनेसह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह 16 हिंदुत्ववादी संघटनाचे कार्यकर्ते आणि भाविक मोठय़ा संख्येने गडावर उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. गडापासून एक किलोमीटर अंतराकर भाविकांची वाहने अडकली जात होती.

कल्याणपासून मलंगगडापर्यंत भाकिकांना शुभेच्छा देणारी होर्डिंग ठिकठिकाणी उभारली होती. यावेळी उपनेते अल्ताफ शेख, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार सुभाष भोईर, रूपेश म्हात्रे, रवींद्र फाटक, कल्याणच्या महापौर विनिता राणे, ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे, संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, अंबरनाथ नगराध्यक्षा मनीषा काळेकर, माजी महापौर राजेंद्र देवळेकर, रमेश जाधव, महानगरप्रमुख विजय साळवी, कल्याण शहरप्रमुख विश्वनाथ भोईर, गटनेते दशरथ घाडीगावकर, स्थायी सभापती दीपेश म्हात्रे, जिल्हा महिला संघटक विजया पोटे, रवी पाटील, प्रकाश पेनकर, रमेश म्हात्रे, सचिन बासरे, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, दिनेश देशमुख, भाईनाथ महाराज, अशोक म्हात्रे, कैलास शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यासाठीच आंदोलन
काही वर्षांपासून मलंगगडावर मुस्लिम समाजाने हे स्थान हाजी मलंग असल्याचा दावा केला आहे. तसेच या ठिकाणी अनधिकृत बांधकामही केले आहे. याविरुद्ध हिंदू भाविकांनी हरकत घेतल्यानंतर धर्मादय आयुक्तांनी हे सर्वधर्मीय स्थळ असल्याचे मान्य केले. मात्र मुस्लिम समाज वक्फ बोर्डाचा हवाला देऊन हा दर्गा असल्याचे सांगत आहे. यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. असे असले तरी शिवसेनाप्रमुखांच्या प्रेरणेने शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगमुक्तीचे आंदोलन सुरू झाले.