निर्माणाधीन भींत पडल्याने तीन कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना ऑनलाईन । पुणे

पुण्यातील पिंपळे गुरव वसाहतीत एका निर्माणधीन मंदिराचा स्लॅब कोसळून तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत चार कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली असून या दुर्घटनेत सुरुवातीला सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चौघांची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे समजते.