वडखळ जेएसडब्लू कंपनी समोर पिकअप व मोटारसायकल अपघातात दोन तरुण जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग वडखळ येथील जेएसडब्लू कंपनीच्या समोर अपघात पिकअप टेम्पो व मोटार सायकलमध्ये झालेल्या अपघातात दोन मोटार सायकलस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली. विकी ठाकूर व अक्षय जुईकर अशी जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील गावातील हे तरुण असून याबाबत वडखळ पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथिल विकी व अक्षय हे तरुण आपल्या मोटार सायकलवरून येत होते. त्यावेळी पिकअप टेम्पो याला मोटार सायकलची जोरदार धडक बसून दोघेही तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच शहाबाज चौकीचा पाडा येथील ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दोघा तरुणांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मात्र दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. या अपघाताबाबत वडखळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.