
टीप्स : रक्त शुद्ध करण्यासाठी
- आहारामध्ये लिंबाचा नेहमी समावेश कराल तर तुमचे रक्त शुद्ध होईल. यासाठी गरम पाण्यामधून लिंबाचा रस दिवसातून तीनवेळा घेतला पाहिजे.
- एका लिंबाचे चार भाग करा आणि चार कप दूध घेऊन त्या प्रत्येक कपामध्ये 10 मिनिटांच्या अंतराने एकेक तुकडा पिळा आणि लगेच प्या. प्रत्येक 10 मिनिटानंतर एक कप प्यावे, असे 5 आठवडे केल्याने शरीरातील रक्त स्वच्छ होईल आणि शरीरात नवी शक्ती संचारेल. भूक चांगली लागून बद्धकोष्ठता दूर होईल.
- कारल्याचा 60 ग्राम रस एक कप पाण्यात एकत्र करून रोज नियमित काही दिवस सेवन केले तर रक्त शुद्धीकरण होईल.
- कडूलिंबाच्या पिकलेल्या 10 लिंबोळ्याचा रस शोषून घेतल्यानेही फायदा होईल. त्यामुळे रक्त शुद्ध होते.
- कांद्याचा रस पाव कप आणि एका लिंबाचा रस (किंवा मध) एकत्र करून 10 दिवस रोज नियमित सेवन केल्याने रक्ताच्या संबंधित कोणताही विकार असेल तर तो दूर होईल.
- आवळा वापरत असाल तर त्यामुळे रक्तामध्ये वाढलेली उष्णता कमी होते, रक्तातील अशुद्ध घटकद्रव्ये दूर होऊन ते शुद्ध होते. आवळ्यामध्ये विटामिन सी असल्याने नवीन रक्त तयार करण्यासही ते फायद्याचे ठरते.



























































