परळीचे विद्यार्थी सिंगापूर अभ्यास दौऱ्यावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। परळी वैजनाथ

दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूलच्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा भाग म्हणून इयत्ता 6 वी, 7 वी व 8 वी चे विद्यार्थी .3 मार्च पासून कॅथोलिक पब्लिक स्कूल सिंगापूर येथे एक आठवड्याच्या अभ्यास दौऱ्यासाठी जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्क्षा उषा गित्ते यांनी दिली आहे.शालेय जिवनातच अंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाची ओळख व्हावी व भविष्यातील जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने सामोरे जाता यावे यासाठी दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल व सिंगापूरच्या कॅथोलिक पब्लिक स्कूल मध्ये करार झालेला आहे.

या दौऱ्यासाठी सत्यम तांबडे, ज्ञानेश्वर गुट्टे व वरद देशमुख यांची या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेली आहे.विद्यार्थ्यांसोबत शाळेतील विज्ञान विषयाचे शिक्षक वसंत नेमाने जाणार आहेत.निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी संस्था अध्यक्षा उषा गित्ते व किरण गित्ते IAS यांचे आभार व्यक्त केले आहेत.मराठवाड्यातील मुलांना अंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण परळीतच उपलब्ध करुन देण्याचा दिल्ली पब्लिक स्कूल चा नेहमीच प्रयत्न असतो अशी माहिती मुख्याध्यापक तेजस कुमार यांनी दिली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलन व बौद्धिक क्षमता रुंदावणार आहेत,या अभ्यास दौरयाच्या पुढच्या टप्प्यात पुढील वर्षी सिंगापुरचे विद्यार्थीही आपल्या शाळेला भेट देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.