
सामना प्रतिनिधी, मुंबई
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात उपसमिती नेमली जाईल. या समाजाला आरक्षण देताना आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक उद्या, शनिवारी होणार आहे.
टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) यांनी सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली. उपसमितीची पहिली बैठक उद्या शनिवार, 2 मार्च रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील–निलंगेकर या सदस्यांचा समावेश आहे.



























































