
सामना ऑनलाईन, वाघा-अटारी सीमा
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे शुक्रवारी हिंदुस्थानात सकुशल परत आले. ते जेव्हा पाकिस्तानची हद्द ओलांडून हिंदुस्थानात आले तेव्हा त्यांच्यासोबत एक महिला देखील होती. अनेकांनी ही महिला त्यांची पत्नी आहे असा समज केला होता. मात्र ही महिला अभिनंदन यांची पत्नीही नाही आणि नातेवाईकही नाही.

या महिलेचे नाव फरिहा बुगती असं आहे. त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र सेवा मंत्रायलातील अधिकारी आहेत. हिंदुस्थानशी निगडीत प्रकरणांमध्ये त्यांना समाविष्ट केले जाते. बुगती यांच्याकडे कुलभूषण जाधव यांचेही प्रकरण सोपवण्यात आले होते. जाधव सध्या पाकिस्तानच्या कैदेत असून त्यांचा खटला सध्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू आहे. जाधव यांना भेटायला जेव्हा त्यांची पत्नी आणि आई पाकिस्तानात गेल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत बुगती हजर होत्या.

























































