उच्च दाबाच्या वीजेच्या तारेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

सामना प्रतिनिधी । नांदेड

एका लग्नाच्या कार्यक्रमात गच्चीवर टेंट लावणाऱ्या एका कामगाराला उच्च दाबाच्या वीज वाहिनीचा धक्का लागल्याने त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाला. शहरातील ईस्लामपूरा भागातील एका घऱात ही दुर्घटना घडली आहे. नई अबादी येथील युसूफ अजीज असे त्या मृत कामगाराचे नाव आहे.

या घरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते होता. त्या कार्यक्रमासाठी त्यांना घराच्या गच्चीवर टेंट लावायचा होता. त्यासाठी अजीज यांना बोलावण्यात आले होते. ते गच्चीवर टेंट बांधत असतांना त्या घराच्यावर विद्युत वितरण कंपनीची उच्चदाबाची एक तार लोंबकळत होती. त्या तारेमुळे गच्चीला लागून असलेल्या लोखंडी सळईतून देखील वीजप्रवाह होत होता. त्या सळईला अजीज यांचा स्पर्श झाल्यानंतर ते तेथेच चिकटले व त्या जबरदस्त धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इतवारा पोलीसांना विचारले असता अद्याप त्यांच्याकडे काहीच माहिती नसल्याचे सांगितले. युसूफ अजिजच्या या दुर्देवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.