अलिबाग तालुक्यातून अनंत गीतेंना एकवीस हजारांच्यावर मताधिक्य देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अलिबाग

अलिबाग तालुक्यातून शिवसेना भाजप युतीचे उमेदवार अनंत गीते याना 21 हजाराच्या वर मताधिक्य मिळवून देणार असून पुन्हा गीतेना संसदेत पाठवणारच, असा निर्धार अलिबाग येथे शिवसेना भाजप पदाधिकारी यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. 28 मार्च रोजी युतीचे उमेदवार अनंत गीते हे उमेदवारी अर्ज भरणार असून युवा नेते आदित्य ठाकरे उपस्थित राहणार असल्याची माहिती सुरेंद्र म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अलिबाग शहरातील बिग फ्लॅश हॉटेल येथे शिवसेना भाजप युतीच्या पदाधिकाऱ्याची बैठक आयोजित केली होती. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, राजीप विरोधी पक्षनेते सुरेन्द्र म्हात्रे, तालुकाप्रमुख राजा केणी, भाजप तालुकाप्रमुख हेमंत दांडेकर, विजय कवळे, भाजपचे अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, संघटक सतीश पाटील, माजी तालुकाप्रमुख दीपक रानवडे, शहरप्रमुख संदीप पालकर, प्रवक्ता विकास पिंपळे, सतीश लेले, शंकर गुरव, अजित पाटील आदी शिवसेना भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पनवेल येथे झालेल्या शिवसेना व भाजप युतीच्या नेत्याच्या बैठकीच्या अनुषंगाने आज जिल्ह्यात दोन्ही पक्षाच्या तालुकानिहाय बैठका संयुक्तरित्या घेण्यात आल्या. अलिबाग येथे बिग फ्लॅश येथे अलिबाग तालुक्यातील शिवसेना व भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांना 21 हजाराच्या वर मताधिक्य अलिबाग तालुक्यात मिळवून देणार असल्याचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी यांनी सांगितले. तर स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्रित पणे नियोजन बद्ध काम करण्यासाठी ही बैठक घेण्यात आल्याचे महेश मोहिते यांनी सांगितले. शिवसेना व भाजप युती ही जनमाणसातील युती असून भविष्यातही अशीच राहणार आहे असे मोहिते यांनी सांगितले.

आमची युती ही नैसर्गिक असून आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. शिवसेना व भाजप दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी एकत्रित काम करून गीतेंना पुन्हा संसदेत पाठविणार असल्याचे सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. अलिबाग मुरुड विधानसभेमध्ये तीन सदस्य हे जिल्हा परिषदेत शिवसेनेचे आहेत. तर मुरुड नगरपालिका शिवसेनेकडे आहे. 2014 च्या विधानसभेत शिवसेनेला चांगले मताधिक्य होते. त्यामुळे इथली लढाई ही शिवसेना विरुद्ध शेकाप अशी असल्याचे विजय कवळे यांनी पत्रकार परिषदेत म्हणाले.