शेकापच्या ओंजळीने पाणी पिण्यास काँग्रेसचा नकार; पार्थ पवारांची मावळमध्ये डोकेदुखी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उरण

रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीने शेकापसोबत घरोबा केल्याने काँग्रेसच्या नेत्यांचे पित्त खवळले आहे. दगाबाज शेकापच्या ओंजळीने आम्ही पाणी पिणार नाही अशी स्पष्ट भूमिका पनवेल, उरण काँग्रेसने घेतल्याने उरण, पनवेल, खालापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचे तारू प्रचाराच्या रणधुमाळीआधीच भरकटू लागले आहे.

अलिबाग, पेण आणि उरणच्या काही भागापुरता शिल्लक राहिलेला शेतकरी कामगार पक्ष नेहमीच स्वार्थी राजकारणासाठी ओळखला जातो. एकेकाळी राष्ट्रवादीविरोधात उघडपणे बंड करणारे शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी आता थेट पार्थ पवार यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र रायगड जिह्यात काँग्रेस-शेकापमध्ये साप आणि मुंगसाचे नाते असल्याने पनवेल व उरणमधील काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी उघडपणे बंड करण्यास सुरुवात केली आहे.

वरिष्ठ पातळीवरून समजुतीचे प्रयत्न
दगाबाज शेकापच्या ओंजळीने आम्ही पाणी पिणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आधीच टेन्शनमध्ये असलेल्या राष्ट्रवादीची या नव्या लोच्यामुळे डोकेदुखी वाढली असून काँग्रेसची समजूत काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.