सराईत दरोडेखोरांची टोळी हत्यारे, वाहने व चोरीच्या मोबाईलसह जेरबंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नगर

सराईत दरोडेखोरांची टोळी हत्यारे, वाहने व चोरीच्या मोबाईलसह येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा लावून सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपीमध्ये कुमेर कादर जुनानी (वय 22, काझीबाबा रोड, वॉर्ड नं.2,श्रीरामपूर), शाहबाज सलीम शहा (वय 20, रा.काझीबाबा रोड, वॉर्ड 2,श्रीरामपुर), समीर सुलतान शहा (वय 25, रा.बजरंग चौक, वार्ड नं.2,श्रीरामपुर,), गोट्या उर्प अरबाज जब्बार शहा (वय 20,फकीरवाडा,वार्ड नं.1 श्रीरामपूर) तर हे दोघे अनिल विष्णू साळवे (रा.निपानी, वडगाव, श्रीरामपूर), राहुल किशोर भालराव (रा.वडाळा महादेव, ता.श्रीरामपूर) पसार झाले आहे.

सविस्तर मिळालेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील गुन्हेगार समीर सुलतान शहा हा त्याच्यासोबत 4 ते 5 साथीदारांसह दाने मोटार सायकलवरून ट्रिपल सीट बसून नगर ते मनमाड रोडने नगर शहराचे दिशेने कोठेतरी दरोडा घालण्यासाठी येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. यावरून त्यांनी सापळा लावून पोलिसानी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता यांच्या कब्जातून एक लोखंडी सुरा, एमक सत्तुर, दोन लागडी दांडके व दोन मोटार सायकली, एक सॅमसंग कंपनीचा व एक एमआय कंपनीचा असे दोन मोबाईल जप्त करून सुमारे 90 हजार 350 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे. आरोपींवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.