कुत्र्याच्या पिल्लावर बलात्कार केल्या प्रकरणी एकाला अटक, व्हिडीओ व्हायरल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

तमिळनाडूतील चेन्नई शहरात कुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. भास्कर असे त्या आरोपीचे नाव असून त्याचा बलात्कार करतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. तो व्हिडीओ चेन्नईत व्हायरल झाला आहे. प्राणी हक्क संघटनेचा कार्यकर्ता साई विग्नेश याने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली आहे.

भास्कर याने 14 मार्चनंतर  माधवराम भागातील मार्थुर मैदानावर भटक्या कुत्र्याच्या चार पिलांवर बलात्कार केला. त्याचे हे कृत्य सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झाले आहे. साई विग्नेश याच्या हाती हे फुटेज लागल्यानंतर त्याने माधवराम मिल्क कॉलनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली. तसेच अल्मायटी अॅनिमल केअर ट्रस्ट या संघटनेने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून देखील याला वाचा फोडली आहे.

याआधी नोव्हेंबर महिन्यात मुंबईत एका कुत्र्याचा चार नराधमांनी लैंगिक छळ केल्यानंतर त्या चौघांचा मृत्यू झाला होता. त्या चौघांनाही पोलिसांनी अटक केली.