
सामना प्रतिनिधी । परभणी
सध्या परभणीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्राप्त माहितीवरुन तत्काळ कारवाई करण्याची मोहिम स्थानिक अन्वेषण गुन्हा शाखेने हाती घेतली आहे.
शहरातील उड्डाण पुलाखाली सापळा रचून एका वाहनात बसून जाणार्या दोन संशयितांचा पाठलाग केला असता, एक गावठी पिस्तुल, जिवंत काडतूस व धारदार शस्त्र बाळगणार्या हिंगोली जिल्ह्यातील करतारसिंग टाक आणि कुलदिपसिंग टाक या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून वाहनासंह धारदार शस्त्र असा ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त करत दोघांना अटक केली आहे.



























































