जीवनसाथीची अचूक निवड करण्यासाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सची मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयुष्याचा योग्य जीवनसाथी निवडणे हे सध्या युवक-युवती आणि त्यांचे पालक यांच्यापुढचे मोठे आव्हानच होऊन बसले आहे. समोरच्या व्यक्तीला खोटी माहिती देऊन फसवणाऱयांची संख्याही फार वाढली आहे. तरुण-तरुणी आणि पालकांची ही समस्या सोडविण्यासाठी खासगी गुप्तवार्ता तंत्राची (आर्टिफिशल इंटेलिजन्स) मोठी मदत मॅट्रिमोनी संकेतस्थळांना होत आहे.

खासगी गुप्तवार्ता तंत्राने नियोजित वधू-वरांना एकमेकांच्या स्वभावाची आणि राहणीमानाची इत्थंभूत माहिती मॅट्रिमोनी साईटसवर मिळत असल्याने त्यांना योग्य जीवनसाथी निवडणे सहज शक्य होऊ लागले आहे. त्यामुळे खोटा प्रोफाइल संकेतस्थळावर टाकून लग्नाचा बाजार मांडणाऱयांच्या कुटील कारवायांना आळा बसू लागला आहे.

वर-वधूंची अचूक माहिती
नव्या खासगी गुप्तवार्ता तंत्रामुळे मॅट्रिमोनी संकेतस्थळांनी नेमलेले गुप्तहेर विवाहेच्छुक व्यक्तींची अचूक माहिती काढणार आहेत. त्या माहितीची खातरजमा करून वर-वधू आणि त्यांचे पालक निर्धास्तपणे लग्नाच्या मंडपात जाऊ शकणार असल्याची ग्वाही देशभरातील मॅट्रिमोनी संकेतस्थळांनी दिली आहे.