क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयसीसीची इंटरपोलशी हातमिळवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, दुबई:

क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. पण स्पॉटफिक्सिंग, मॅचफिक्सिंग यांसारख्या घटनांमुळे या खेळाला काळा डाग लागतोय. क्रिकेट या खेळाची सर्वोच्च संस्था आयसीसीकडून याला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र गालबोट लावणाऱया घटनांना आळा काही बसेना. अखेर क्रिकेटमधला भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयसीसीने इंटरपोलशी हातमिळवणी केली आहे. आयसीसीचे ऍण्टी करप्शन युनिटचे जनरल मॅनेजर ऍलेक्स मार्शल यांनी गेल्या आठवडय़ात इंटरपोलच्या अधिकाऱयांसोबत याबाबत चर्चा केली.आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजनाचा निर्णय

 194 देशांशी जोडले जाणार

आयसीसी व इंटरपोल हे एकमेकांसोबत काम करण्यास उत्सुक आहेत. गेल्या आठवडय़ात झालेल्या बैठकीत आमचे सूर जुळलेत. आयसीसीचे काही देशांमधील कायदेशीर एजन्सीसोबत चांगले संबंध आहेत. आता इंटरपोलसोबत हातमिळवणी केल्यामुळे 194 देशांशी आयसीसी जोडली जाणार आहे, असे ऍलेक्स मार्शल यावेळी म्हणाले.

खेळाडूंना शिक्षण देणार

इंटरपोलचे नेटवर्क विशाल आहे. त्यामुळे इंटरपोलच्या सहाय्याने खेळाडूंना भ्रष्टाचारापासून रोखण्यासाठी शिक्षण देण्यात येईल. भ्रष्टाचाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलले आहे, असे ऍलेक्स मार्शल यावेळी स्पष्टपणे म्हणाले.