कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा पुन्हा लीक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नवी दिल्ली

जगातील सर्वात मोठी सोशल माध्यम कंपनी फेसबुक आपल्या युजर्सचा डेटा सुरक्षित ठेवू शकत नाही हे वेळोवेळी उघड झाले आहे. त्यामुळे ही कंपनी वादाच्या भोवऱयातही अडकली होती. त्यासाठी फेसबुकने अनेकदा माफीही मागितली, पण आता पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाला आहे. या वेळी लीकचा हा प्रकार ऍमेझॉन क्लाऊडच्या सर्व्हरकडून घडला आहे, अशी माहिती सायबर संरक्षण कंपनीने गुरुवारी दिली. फेसबुकसाठी काम करणाऱया दोन कंपन्या (थर्ड पार्टी) यूजरचा संपूर्ण डेटा ऍमेझॉन क्लाऊडकर स्टोअर करतात. त्यातील मेक्सिकोमधील डिजिटल मीडिया कंपनीकडून हा डेटा लीक झाला असल्याचे अपगार्ड सायबर सुरक्षा कंपनीने म्हटले आहे. या कंपनीने फेसबुक युजरचा 146 जीबी डेटा गोळा केला होता. दुसऱया एका कंपनीने 22 हजार फेसबुक युजरचे आयडी, प्रेंडस्, फोटो, लोकेशन आणि अनप्रोटेक्टेड पासकर्ड स्टोअर केले आहेत.