
सामना प्रतिनिधी, पालघर
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे पालघर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजेंद्र गावीत यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल केला. ढोलताशांचा गजर करत महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठय़ा जल्लोषात यावेळी रॅली काढतानाच ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी शिवसेना नेते व पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालघर जिह्याचे संपर्कप्रमुख रवींद्र फाटक, आमदार प्रताप सरनाईक, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, जिल्हाप्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, लोकसभा संघटक श्रीनिवास वनगा, पालघर महिला संपर्क संघटक ममता चेंबूरकर, दीपा पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळ अध्यक्षा ज्योती ठाकरे, कोकण पाटबंधारे उपाध्यक्ष जगदीश धोडी, रमाकांत रात, जिल्हा महिला संघटक ज्योती मेहेर, डहाणू नगराध्यक्ष भरत रजपूत तसेच महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.

























































