तामीळनाडूत काँग्रेस कार्यकर्त्यांची फोटो जर्नालिस्टला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

काँग्रेसच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो घेणाऱ्या एका फोटो जर्नालिस्टला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. एकिकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पत्रकारांना सन्मान देत असताना दुसरीकडे मात्र काँग्रेस कार्यकर्ते पत्रकारांवर मुजोरी करत आहेत.

तमीळनाडूमधील विरुधनगर येथे शनिवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षाची जाहीर सभा होती. मात्र सभेला गर्दी न जमल्याने बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. सभा सुरू असताना एका फोटो जर्नलिस्टने सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो घेणाचा प्रयत्न केला. त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या पत्रकाराला पकडून मारहाण केली. भर सभेत पत्रकाराला मारहाण केल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.