कृष्णविवराचे पहिले छायाचित्र

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

आतापर्यंत कृष्णविवराची केवळ कल्पना केली जात होती. मात्र अंतराळ संशेधकांनी बुधवारी नयनरम्य कृष्णविवराचे पहिले छायाचित्र जारी केले. ‘एम-87’ या आकाशगंगेमधील 53.5 दशलक्ष प्रकाशवर्षे दूर असलेल्या या महाकाय विशाल अशा कृष्णविवराचे छायाचित्रच या संशोधकांनी प्रसिद्ध केले. या छायाचित्रात कृष्णविवरामधून गॅस आणि प्लाजमा यांचा निघणारा नारिंगी रंग दिसत आहे. छायाचित्र घेतल्यानंतर संशेधकांनी ब्रसल्ज, शांघाई, टोकियो, वॉशिंग्टन, सेंटियागो आणि तायपे येथे एकाच वेळी पत्रकार परिषद घेऊन कृष्णविवराचे हे पहिले छायाचित्र लोकांसमोर सादर केले.

काय आहे कृष्णविवर?

कृष्णविवर एक अशी खगोलीय शक्ती आहे, जिचे गुरुत्काकर्षण क्षेत्र खूपच शक्तिशाली आहे. त्याच्या गुरुत्वाकर्षणापासून कुणीही वाचू शकत नाही. या कृष्णविवराच्या चारही बाजूला एक सीमारेषा आहे.