
सामना प्रतिनिधी, मुंबई
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काम करणाऱया कर्मचाऱयांना यंदा 20 टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे ‘शाईन डॉट कॉम’ने केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. दिल्ली आणि बंगळुरू येथील कर्मचाऱ्यांना मात्र त्यांच्या पगारात किमान 0-10 टक्के वाढ होईल, असे वाटत असल्याचे या सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
आयटी, बँकिंग, फायनान्स, औद्योगिक उत्पादने, शिक्षण व प्रशिक्षण, एफएमसीजी आदी क्षेत्रातील कर्मचाऱयांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. मुंबईसह पुणे आणि चेन्नईतील कर्मचाऱयांनाही 20 टक्के पगारवाढीची अपेक्षा आहे. मुंबईतील 37 टक्के, पुण्यातील 36 तर चेन्नईतील 38 टक्के कर्मचाऱयांनी ही अपेक्षा व्यक्त केली. बंगळुरूतील 21 टक्के कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार शून्य ते 10 टक्क्यांदरम्यान वाढेल अशी शक्यता वाटते.
विविध महानगरे आणि क्षेत्रांमधील कर्मचाऱयांमध्ये पगारवाढीच्या अपेक्षांचे प्रमाण वेगवेगळे आहे. अनेक क्षेत्रांतील कर्मचाऱयांची जास्त पगारवाढीची अपेक्षा असली तरी सर्वच कंपन्या त्या पूर्ण करतील असे नाही, असे ‘शाईन डॉट कॉम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सायरस मास्टर यांनी सांगितले.
























































