थलैवा रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात, चेन्नईत केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । चेन्नई

सुपरस्टार रजनीकांत यांनी  आपण तमिळनाडूची आगामी विधानसभा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच मोदी पुन्हा निवडून येणार का प्रश्नावर 23 मे ची वाट पाहा असे उत्तर दिले. घराबाहेर आलेल्या माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी हे प्रतिक्रिया दिली.

तमिळनाडूमध्ये 18 विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुका सुरू आहे. त्यासंबंधी माध्यमांनी रजनीकांत यांना विचारले. लोकसभा निवडणुकीसोबत तमिळनाडूमध्ये 18 जागांसाठी पोटनिवडणुका सुरू आहे. या निवडणुकीत जर अण्णा द्रमुकला बहुमतासाठी जर जागा कमी पडल्या आणि जर निवडणुकांच्या घोषणा झाल्या तर आम्ही निवडणूक लढवू असे रजनीकांत यांनी जाहीर केले. तसेच मोदी येणार की नाही यासाठी 23 मे पर्यंत आपल्याला वाट पहावी लागणार असेही रजनीकांत म्हणाले.