
सामना ऑनलाईन । कोलंबो
रविवारी सकाळी सहा साखळी स्फोटांनी श्रीलंका हादरली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर उर्वरित 3 बॉम्बस्फोट पंचतारांकित हॉटेल्समध्ये झाले आहेत. ही घटना रविवारी सकाळी 8.45 वाजण्याचा सुमाराला घडली. या भयंकर स्फोटांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 185 वर गेला असून त्यात 35 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. इस्टर संडेच्या दिवशी हे स्फोट घडल्याने खळबळ माजली आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
Multiple explosions in Colombo and other parts of Sri Lanka, reports Sri Lankan media. More details awaited pic.twitter.com/WunBhnt5EA
— ANI (@ANI) April 21, 2019
#UPDATE Srilankan media: More than 25 people reported dead & more than 200 injured following several explosions in Colombo pic.twitter.com/qm3vkjT5Ah
— ANI (@ANI) April 21, 2019
कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. तर किंग्ज बेरी, शांग्रिला आणि सिनामोन अशी स्फोट झालेल्या हॉटेल्सची नावं आहेत. यातील दोन बॉम्बस्फोट हे सुसाईड बॉम्बर्सने केले आहेत तर उर्वरित बॉम्बस्फोट बॉम्ब पेरून करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे. या स्फोटात वापरण्यात आलेल्या स्फोटकांविषयी निश्चित माहिती मिळत नसली तरीही हे आयईडी स्फोट असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पर्यटक आणि विदेशी नागरिक यांना लक्ष्य केल्याचं या स्फोटांमधून निदर्शनास येत आहे.
#BREAKING: Death toll rises to at least 160 following bombings in Sri Lanka.
— UA News (@UrgentAlertNews) April 21, 2019
अद्याप या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबो इथल्या उच्चायुक्तांच्या संपर्कात राहून घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
EAM Sushma Swaraj on multiple blasts in Srilanka: I am in constant touch with Indian High Commissioner in Colombo. We are keeping a close watch on the situation. (file pic) pic.twitter.com/vFZm1u8nky
— ANI (@ANI) April 21, 2019
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला असून हिंदुस्थान या प्रसंगात श्रीलंकेच्या नागरिकांसोबत खंबीरपणे उभा आहे, अशी ग्वाही देखील दिली आहे. मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून या हल्ल्यातील जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थन करत असल्याची प्रतिक्रिया पतंप्रधानांनी दिली आहे.
PM Modi: Strongly condemn the horrific blasts in Sri Lanka. There is no place for such barbarism in our region. India stands in solidarity with the people of Sri Lanka. My thoughts are with the bereaved families and prayers with the injured. (file pic) pic.twitter.com/YBICcCn3iE
— ANI (@ANI) April 21, 2019
























































