करडखेड येथे बस चालकास बेदम मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

उदगीर तालुक्यातील करडखेड येथे एसटी बसच्या चालकास बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी दोघांविरुध्द उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हरिबा शंकरराव मोरे (42) एसटी बस चालक हा लातूर – उदगीर बस घेऊन जात असताना 33 के.व्ही. सबस्टेशन करडखेड येथे समोरुन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे आलेल्या कार चालकाने बसला घासून कार नेली व पुन्हा बस चालकास बसमधून ओढून बेदम मारहाण केली. शासकीय कामात अडथळा केला म्हणून राजकुमार रत्नाकर बिरादार व इतर एकाविरुध्द हरिबा मोरे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बसवंते करीत आहेत.